A blog about everything that makes my day brighter, just like a steaming mug of coffee does!
Tuesday, 12 December 2023
असतो जर मी सफरचंद... (अनुवादित)
Monday, 6 November 2023
वाकळ
कॉलेजमधले सोनेरी दिवस कसे भुर्रकन उडून जातात समजत सुद्धा नाही . सगळी पाखरे आपापल्या दिशेला निघून जातात... आपापल्या परीने नवीन नात्यांच्या रेशीमगाठी बांधून आयुष्य सजवतात...मात्र, दूर कुठेतरी त्या जुन्या घरट्यात वाट पाहत असते, कित्येक वर्षांपूर्वी जोडलेल्या निखळ मैत्रीच्या धाग्यांनी शिवलेली , जुनीपुराणी पण मायेची ऊब देणारी, एक 'वाकळ'!
वाकळ
पंखांमध्ये बळ घेवोनी
कवेत घेऊन आठवणी
घरटे सोडुन जाई पाखरा
जिथे तुझे दाणा - पाणी
घेई भरारी दूर नभीं तू
तुला खुणावी क्षितिज नवे
आयुष्याचा विणण्या शेला
नवीन रेशिमबंध हवे
अंगी लेऊन वस्त्र भरजरी
विसरू नको घरट्यामधली
उबदार परी जुनीपुराणी
वाकळ ती अंथरलेली
बनली ना ती जरी बापडी
तलम रेशमी ताग्यांनी
निगुतीने शिवली मैत्रीच्या
प्रेमळ कच्च्या धाग्यांनी
घरट्याची मग हाक ऐकुनी
परतून येई कधी घरी
जीर्ण काहीशी वाकळ तरीही
पांघरून बघ कधीतरी
येताना परि आण सोबती
जुन्या आठवांचे तागे
मोरपिशी अलवार क्षणांचे
थोडेसे रंगीत धागे
गतकाळातील न मारलेल्या
गप्पा घेऊन ये थोड्या
आणि आपुले वय विसराया
काही घेऊन ये खोड्या
जवळ घेऊनी तिजला थोडे
बारकाईने मग पाही
सोबतचे सामान घेऊनी
दोर उसवले शिव काही
अंगी रोज तू खुशाल मिरवी
वस्त्र तुझे ते जरतारी
कधीतरी घरट्यात येऊनी
वाकळीतही रंग भरी
- माधुरी
Quilt..
With strong wings
and memories lovely
let go the nest, birdie,
skies are calling.
fly for the blue skies,
chase the horizons
weave your life
own and anew.
drape in robes of
success and prosperity,
but don't you forget
the quilt, of home.
it may be worn out,
perhaps lost sheen,
made of love and friendship
it's always been.
Then heed often
the calls of home
and return, longingly
to the quilt, of home.
bring home some strains
and memories of your travails,
moments of weakness,
and your victories on them.
bring along some stories
that you have told no one
and some mischief
to forget your age.
hold your quilt close
and stories you wove in it,
repair it here and there
with some new stories.
flaunt exquisite robes
while you walk in public,
but when you are home
your quilt holds you quiet.
-Shreyas Desai
Friday, 28 July 2023
जगणे... (अनुवाद)
'If I can stop one heart frombreaking' या एमिली डिकिंसन या कवयित्रीच्या कवितेचा भावानुवाद..
If I can stop one heart from breaking,
I shall not live in vain;
If I can ease one life the aching,
Or cool one pain,
Or help one fainting robin
Unto his nest again,
I shall not live in vain.
- Emily Dickinson
अनुवाद:
Monday, 12 June 2023
एका शनिवारी... (अनुवादित)
Dave Crawley यांची ही अतिशय गोड कविता वाचनात आली. या कवितेचा मी केलेला मुक्त अनुवाद...
Saw my teacher on a Saturday!
I can’t believe it’s true!
I saw her buying groceries,
like normal people do!
She reached for bread and turned around,
and then she caught my eye.
She gave a smile and said, “Hello.”
I thought that I would die!
“Oh, hi…hello, Miss Appleton,”
I mumbled like a fool.
I guess I thought that teacher types
spend all their time at school.
To make the situation worse,
my mom was at my side.
So many rows of jars and cans.
So little room to hide.
Oh please, I thought, don’t tell my mom
what I did yesterday!
I closed my eyes and held my breath
and hoped she’d go away.
Some people think it’s fine to let
our teachers walk about.
But when it comes to Saturdays,
they shouldn’t let them out!
- Dave Crawley
अनुवाद: एका शनिवारी...
शाळेमधल्या बाईंना मी
पाहियले एका शनिवारी
तुमच्या - आमुच्यापरीच त्याही
दिसल्या जाताना बाजारीं
वाण्याच्याच दुकानीं त्यांची
माझ्यावरती दृष्टी पडली
हसून त्या मग बोलू लागतां
माझी घाबरगुंडी उडली
वेंधळ्यापरी भांबावून मी
नमस्कार बाईंना केला
समजत होतों बाई जाती
सुट्टीमध्येही शाळेला
आईही मजसोबत होती,
दुष्काळीं तेरावा महिना
इवल्याश्या त्या जागेमध्ये
कुठे लपावे काहीं कळेना
"राम! राम!" म्हटले मी, "बाई
जाऊ देत येथुनी लवकर"
खोडी कालच्या वर्गामधली
आईला माझ्या कळली तर?
लाभ बाईंच्या सन्निध्याचा
केवळ शाळेमध्येच व्हावा
सुट्टीच्या दिवशीं परि त्यांना
घरीच त्यांच्या कोंडून ठेवा!
- माधुरी
Tuesday, 6 June 2023
हाक...
" देहाला इतके कष्ट देऊन काय साध्य करणार आहेस?" देव तिब्बा चा ट्रेक करायचा ठरल्यानंतर मित्र मला विचारत होता. मी मात्र गप्पच! खरं सांगायचं तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर माझ्याकडे तरी कुठे होतं?
गुढग्याच्या दुखापतीतून बाहेर पडल्यानंतर, खरं तर नवरोबाच्या आग्रहास्तव ट्रेक करायचा ठरवला. " तुझाच आत्मविश्वास वाढेल" हे त्याचं मत. नेहमीच्या त्याच त्या रूटीन मधून मलाही थोडा विरंगुळा हवाच होता! थोड्याफार शारिरिक आणि मानसिक तयारीच्या जोरावर उडी घेतली खरी, पण पुढचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी दिव्यच होतं!
पण जसजसा हा प्रवास उलगडत गेला, तसतसं हिमालयाचं एकेक निराळंच, कधीही न पाहिलेलं रूप समोर येऊ लागलं. हिमालयाला महादेवाचं निवासस्थान का मानलं गेलं असेल? का बरं आपल्या ऋषीमुनींना युगानुयुगांपासून या हिमशिखरांची भुरळ पडली असेल? या प्रश्नांच्या गाठी हळूहळू उकलायला लागल्या होत्या. इथे काहीतरी वेगळं, भव्यदिव्य... काहीतरी larger than life होतं नक्कीच! आणि सभोवताली होता, कणाकणात 'त्याच्या ' अस्तित्वाची पावलोपावली जाणीव करून देणारा उत्तुंग हिमालय!
महादेवाच्या कर्पूरगौर वर्णाशी साधर्म्य साधणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा... जटेमधील गंगेच्या निर्मळ पाण्यासारखे खळाळते जलस्त्रोत अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या. क्वचित् प्रसंगी त्याच्याच कपाळामधल्या अग्नीसारखा दाहक भासणारा प्रखर सूर्य! या विलक्षण प्रवासात ज्याच्या असंख्य छटांचं अगदी जवळून दर्शन घडलं तो- कधी त्या सांब- सदाशिवासारखा शांत आणि नितांतसुंदर भासणारा, तर कधी त्याच्याप्रमाणेच रौद्रभीषण अवतार धारण करणारा- हिमालय!
प्रवासात अडचणीही अनेक आल्या. पण त्यांच्याशी दोन हात करण्याचे बळ देणारी, प्रसंगी मदतीचे हात उभे करणारी प्रेरक शक्तीही बहुदा त्याचीच असावी!
ऊन - पाऊस - कडाक्याची थंडी असल्या वातावरणात, दिवसाला चार पाच तास चालण्याचे कष्ट घेऊन मला काय मिळालं, याचं उत्तर आता मात्र मला सापडलंय! माझ्या त्या प्रिय मित्राला भेटल्यावर ठामपणे सांगू शकेन - "हिमालयातल्या प्रत्येक कणात वास्तव्य करणाऱ्या त्या महादेवाला मी भेटून आलेय.. आणि त्याला भेटायचं, तर ही तपश्चर्या करणं भाग होतं!"
यापूर्वीच्या प्रवासातसुद्धा हिमालय पाहिला होता. यावेळी मात्र, तो खऱ्या अर्थाने अनुभवलाय! या भेटीत त्याच्याशी काही गहिरे ऋणानुबंध जुळलेत म्हणाना... यापुढे मात्र, जेव्हा जेव्हा ' त्याची ' हाक येईल, तेव्हा तेव्हा त्याची भेट घेणं क्रमप्राप्त आहे!
Saturday, 22 April 2023
प्रश्न झेब्र्याचे...(अनुवादित)
Shel Silverstein यांच्या "Zebra question" या कवितेचा
मराठी अनुवाद:
'Zebra question'
-by Shel Silverstein
I asked the zebra
Are you black with white stripes?
Or white with black stripes?
And the zebra asked me,
Or you good with bad habits?
Or are you bad with good habits?
Are you noisy with quiet times?
Or are you quiet with noisy times?
Are you happy with some sad days?
Or are you sad with some happy days?
Are you neat with some sloppy ways?
Or are you sloppy with some neat ways?
And on and on and on and on
And on and on he went.
I'll never ask a zebra
About stripes
Again.
अनुवाद: प्रश्न झेब्र्याचे
एके दिवशीं मजे- मजेतच
विचारिले मी, "अरे झेब्र्या
रंग तुझा गोऱ्यावर काळा,
की पट्ट्या काळ्यावर गोऱ्या
मान हलवुनी म्हणे झेब्रा
सांगशील तू हे मजला जर
उशिर क्षणाचा ना करता मग
देईन मी प्रश्नाचे उत्तर
अंगी काहीं वाईट खोडी
असलेला तू इसम चांगला
की असशी तू मनुष्य वाईट
कधीतरी जो सभ्य वागला
कधीतरी जो शांत राहतो
असशी ऐसा बोलघेवडा
की असशी तू अबोल जो कधी
गप्पांमध्ये रमतो थोडा
आनंदी तू असशी ज्याच्या
नशिबीं काही क्षण दुःखाचे
की असशी तू दुःखी ज्याच्या
वाट्या लेणे क्षणिक सुखाचें
असशी ऐसा नीटनेटका
कधीतरी जो मांडी पसारा
की एखादे काम नीट अन्
कारभार तो गचाळ सारा
एकापाठी एक जटिल ते
झेब्र्याचे ना प्रश्न संपले
पट्ट्यांबाबत पुन्हा तया मी
पुसायचे ना धाडस केले!
- माधुरी
Tuesday, 24 January 2023
एकमेकां सहाय्य करू..