Tuesday 12 December 2023

असतो जर मी सफरचंद... (अनुवादित)


एक पडणारं सफरचंद- कुणाला गुरुत्वाकर्षण शोधून इतिहास घडवण्याची प्रेरणा देतं... तर तेच सफरचंद पाहून कुणी  छानशी बालकविता लिहितो. आणि कधी, ती बालकविताच प्रेरणा बनते, एका नवीन लिखाणाची..

'If I were an apple ' ही ज्योतिर्मयच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातली सुंदर कविता... कुण्या अनाम कवीने लिहिलेली. या कवितेचा मी केलेला मराठी अनुवाद...


If I were an apple ...

If I were an apple
and grew on a tree
I think I'd drop down
on a nice boy like me.

I wouldn't stay there
giving nobody joy,
I'd fall down at once and
say "eat me my boy!"


                             -Unknown poet



असतो जर मी सफरचंद 

असतो जर मी सफरचंद, अन्
झाडावरती घडलो असतो,
मजसम एका गोड मुलाच्या
डोक्यावर मी पडलो असतो

कोणाला आनंद न देता,
काय मिळे मज तिथे राहुनी,
टपकन्  हातीं येऊन त्याच्या,
म्हणेन मजला टाक खाऊनी!


                      - माधुरी 

6 comments:

  1. माधुरी, उत्तम अनुवाद. 👌. तुझे ब्लॉग्स उत्तम, कविता उत्तम आणि अनुवादीत लेखन ही उत्तम.

    ReplyDelete
  2. एकदम बढिया गं माधुरी‌. किती छान विचार आहे कवितेत‌. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यातलं सुख.

    ReplyDelete