" जुने जाणते घुबड" हा ' That wise old owl ' या इंग्रजी बालगीताचा अनुवाद आहे. सुमारे १८व्या शतकातील या बालगीताचा मूळ लेखक कोण हे माहीत नाही. "मोजकं बोला, निरर्थक बडबड न करता शांतपणे जगाचा अनुभव घ्या" हे त्या अनुभवी घुबडाचा दाखला देत नेमक्या शब्दात मांडणारी ही कविता.
That wise old owl
A wise old owl
sat on an Oak,
The more he saw,
the less he spoke.
The less he spoke,
the more he heard
Why can't we be
like that wise old bird?
- unknown author
जुने जाणते घुबड
जुने जाणते घुबड एकले
झाडावरती बसून राही
दिसामाजि ते कमीच बोले
अधिक जेवढे जगास पाही
आणि घालता जिभेस आवर
कान देऊनी ऐके सारे
जुन्या जाणत्या त्या घुबडासम
होऊ कधी आपणही का रे?
- माधुरी
Advice taken
ReplyDelete