मागणे इतुकेच अमुचे
ऐक तू नारायणा
कलियुगीं आम्हास दे
तव शक्ती शत्रु निवारणा
देश धर्माला बुडविण्या
दैत्य ऐसे माजले
कुटिलबुद्धी पाहुनी ती
लक्ष रावण लाजले
सरळमार्गी राम होऊन
त्यांस निपटावे कसे
शिकवि आम्हा युक्ति ती
जी देई जैश्यासी तसे
दे नृसिंहाच्या बळा, अन्
त्यापरी चातुर्यही
धूर्ततेला लपवी ऐसे
मोहिनी माधुर्यही
वामनाची बुद्धी दे, जी
कार्य साधी गोडिने
मोहनाची दे लबाडी
खोड मोडू खोडिने
मार्ग आम्हा दावण्या तू
सांग रे गीता नवी
देई वृत्ती, वाकुड्यासी
वाकुडे जी वागवी
उशिर झाला फार रे
अवतार तुजला धारण्या
आम्हीच कलकी होऊ रे
आता कलीला मारण्या
- माधुरी
क्या बात है. एकदम कमाल
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमाधुरी, अगं किती सुरेख आणि अर्थपूर्ण कविता लिहिली आहेस. गदय, पदय दोन्ही लिखाणात तु एक नंबर.
ReplyDeleteधन्यवाद !!
Deleteसुंदर आणि छान शब्दात माधवाला घातलेले साकडे वा गा-हाणे ! उशीर झाला फार रे, आता नको येऊस. तुझं काम पूर्ण करण्यास आम्हीच कल्की होऊ रे हेआव्हान मात्र स्वीकारायलाच हवे !
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteVa Madhuri..mastach lihilay
ReplyDeleteThanks!
DeleteBhavita vyachi kalpana ekdam zakas
ReplyDeleteChhaan
Thanks 🙏
Delete