Friday, 31 October 2025

शेवट ( अनुवादित ) - marathi poetic adaptation of the poem 'the ending ' by Ullie Kaye



The ending 

You see, I already know the ending.

Good wins.

Peace prevails.

The dragon is slayed 

and the sword is raised.


But first, we must go through the part of the story where the plot has not yet twisted ,

The battle is not yet won.

The storm is raging.

The tower is locked.

The apple is poisoned.

The wolf is ready and waiting in bed,

wearing grandmother's clothing.


But I already know the ending.

I already know the ending.


- Ullie kaye



शेवट 


दुष्ट राक्षसाला मारोनी

लखलखते खड्गाचे पाते

विजय भल्याचा निश्चित होतो

आनंदाला उधाण येते


उगा कशाला खंत करू मी

कशास ठेऊ मनात भीती

शेवट मजला ठाऊक आहे 

सारे गोडच होई अंती


त्याच्यापूर्वी अटळच आहे

गोष्टीमधला भाग तो परी 

झुंज अजुनही चालू जेथे

अजून भिडलेल्या तलवारी


बंदिवान त्या राजकुमारीचे 

अश्रूंनी डोळे भिजती 

राजकुमारा ठार मारण्या 

निर्मम कारस्थाने शिजती 


वेताळाच्या युक्तीपुढती 

विक्रमराजा अजून फसतो 

म्हातारीला फस्त कराया 

वाघोबाही टपून बसतो


सोडीन ना परि पुस्तक अर्धे 

धीर करुन मी जाईन पुढती 

शेवट मजला ठाऊक आहे

सारे गोडच होई अंती 


- माधुरी 





5 comments:

  1. वा,सुरेख अनुवाद,तुझे मराठीवर चांगलेच प्रभुत्व आहे,अगदी सोप्या भाषेत केलेला अनुवाद मूळ कविताच वाटते

    ReplyDelete
  2. माधुरी, too good, best.

    ReplyDelete
  3. सुंदर अनुवाद ! स्वप्न प्रत्यक्षात येण्या आधीचे वास्तव थोडक्याच पण समर्पक शब्दात व्यक्त केले आहे. छानच.

    ReplyDelete