प्रकटली एके दिनीं जर मजसमोरी शारदा
मोकळी करिते म्हणाली सर्व माझी संपदा
जे हवें तें माग, ना संकोच कसला ठेवतां
हा तुझ्या पदरात मी करितें पुरा खजिना रिता
सांगेन तिजला, भगवती गे, हंसवाहिनि वरप्रदे,
विनती इतुकी ऐक, थोडें हातचें राखून दे
जाणते, तव वैभावासी पार तो नाही जरी,
शब्द साठ्यांतून त्या, दे वेचुनी मोत्यांपरी
चांगलें जगतीं असे, तैसे असे येथें बुरें
हंसपक्षी दुग्ध आणिक जल निराळे जो करे
त्यापरी वेचून साऱ्या वाईटातुन चांगलें
गोड गाथा सांगणारे शब्द केवळ दे भले
काव्य मम कोणा करो ना त्रस्त अन् अस्वस्थ ही
या लेखणीने स्वप्न कोणाचें न हो उध्वस्त ही
नैराश्य - दुःखें गांजला कोणी किती असला जरी
शब्द माझे ओतुं दे नव आस जगण्याची उरीं
मानिलें संसार हा तापत्रयांचा वारसा
काव्य माझें ना बनो कधीही तयांचा आरसा
लेखणी उत्साहची उधळीत राहो नेहमी
हर्ष देईन या जगीं आनंदयात्री बनुन मी
- माधुरी
अप्रतिम! केवळ अप्रतिम!!
ReplyDeleteकाव्याची ही भगीरथ गंगा
अखंड ऐसी वाहत राहो|
शब्द शब्द या गंगेमधला
चातक हृदया तृप्ती देवो|
- अनिल खडके
धन्यवाद!
Deleteमाधुरी, तू कविता चांगल्या मासिका मधे का पाठवत नाही ? सगळ्यां पर्यंत पोचतील. अतिशय उत्तम आहे कविता.
ReplyDeleteThanks
Deleteउत्कृष्ट
DeleteThanks 🙏
Deleteछानच ! लिहित रहा. लोकांच्या जीवनांत असाच आनंद रंग उधळीत रहा.
ReplyDeleteचल उचल ती लेखणी अन् I
उधळ आनंद रंग गगनी I
तप्त रवीही शांत जरासा होई I
उधळण रंगांची ती नभी पाहुनी I
Wonderful.. thanks!!
Delete